दैनिक राशिभविष्य

Adhikarnama | आजचं राशीभविष्य, सोमवार, १४ मार्च २०२२

मेष :

मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सहलीचा आनंद घ्याल. फार काळजी करत राहू नका. प्रवासात काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची मदत होईल.

वृषभ :

उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करता येतील. स्त्रियांशी मैत्री वाढेल. आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील. सुखासक्तपणा जाणवेल.

मिथुन :

कलेतून नावलौकिक वाढेल. कामातून अपेक्षित लाभ मिळवता येईल. कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण लाभेल. घरातील साफसफाई काढाल. नीटनेटकेपणाकडे अधिक लक्ष द्याल.

कर्क :

काही अपेक्षा पूर्ण होण्यास वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी. अपयशाने खचून जाऊ नये. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा लागेल. अतिविचार करू नका.

सिंह :

जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. तिरसटपणे वागू नये. बौद्धिक चुणूक दाखवता येईल. व्यापारी वर्गाला नवीन आशादायी वातावरण लाभेल. नवीन लोक संपर्कात येतील.

कन्या :

कफविकार बळावू शकतात. कामाच्या ठिकाणी समाधान शोधाल. वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरात शांतता जपण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या विश्वासास खरे उतरावे.

तूळ :

तुमची इच्छाशक्ती वाढीस लागेल. साहसाने कामे हाती घ्याल. लिखाणाला बळ मिळेल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. तुमच्यातील सज्जनता दिसून येईल.

वृश्चिक :

सांपत्तिक स्थिती सुधारेल. खर्च वाढू शकतो. आवक-जावक यांचे गणित जुळवावे लागेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होईल.

धनू :

प्रचंड आशावादी दृष्टिकोन ठेवाल. योग्य तर्कनिष्ठ बुद्धी वापराल. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. स्वत:च मान राखण्याचा प्रयत्न कराल. दिलदारपणे वागाल.

मकर:

सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका. पारमार्थिक उन्नती साधता येईल. काही गोष्टींपासून दूर रहावेसे वाटेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. सामाजिक सेवेत हातभार लावावा.

कुंभ :

मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. आर्थिक लाभाकडे बारीक लक्ष ठेवावे. काटकसर करण्याकडे कल राहील. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवाल. आवडी-निवडीवर भर द्याल.

मीन :

आवडत्या गोष्टी कराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. झोपेची तक्रार जाणवेल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. स्व‍च्छंदीपणे वागाल.

आपल्या मोबाईलवर दररोज मोफत राशिभविष्य मिळविण्यासाठी 9766382780 या क्रमांकावर " राशिभविष्य " असे टाईप करून पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close