दैनिक राशिभविष्य

आजचं राशीभविष्य, रविवार १६ ऑक्टोबर २०२२

मेष : नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

वृषभ : कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अति विश्वास टाळावा. सर गोष्टींचा आढावा घ्यावा.

मिथुन : जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील. करियर बदलला काळ अनुकूल. कामासंदर्भात तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल.

कर्क : भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल. एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

सिंह : तुमच्या कालगुणांना वाव मिळेल. ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अतिउत्साहात निर्णय घेऊ नका. कामाची पूर्व तयारी करावी लागेल.

कन्या : घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. मानसिक ताण वाढू देऊ नका. जोडीदारापासून गोष्टी लपवू नका. प्रेमातील व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी.

तूळ : घरासाठी पैसा खर्च कराल. मित्रांचा प्रभाव राहील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडाल.

वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी. मनातील इच्छा प्रबळ राहील. काही मूलभूत गोष्टीत परिवर्तन करावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी प्राधान्याने पार पाडाल.

धनू : सामाजिक मान वाढेल. घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारण्याची प्रबळ इच्छा होईल.

मकर : व्यायामाची संगत सोडू नका. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल. शारीरिक अस्वस्थता कमी होईल. मुलांच्या इच्छा जाणून घ्याव्यात. खरेदीचे योग आहेत.

कुंभ : भावनिक गुंतागुंतीत अडकू नका. आपले कर्तृत्व दाखवून द्या. मनोरंजनात वेळ घालवा. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. जोडीदाराची साथ मिळेल.

मीन : अनाठायी खर्च वाढू शकतो. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.

आपल्या मोबाईलवर दररोज मोफत राशिभविष्य मिळविण्यासाठी 9766382780 या क्रमांकावर " राशिभविष्य " असे टाईप करून पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close