दैनिक राशिभविष्य

आजचं राशीभविष्य, बुधवार २९ जून २०२२

मेष:-
आपल्या हिंमतीने सर्वांची दाद मिळवाल. मनातील इच्छा पूर्णत्वास येईल. सहकारी वर्गाचे सहाय्य मिळेल. जिद्दीने कामे तडीस न्याल. कौटुंबिक वातावरण हलके फुलके ठेवाल.

वृषभ:-
नवीन बौद्धिक आव्हान स्वीकाराल. सर्वांचे हित लक्षात घेऊन वागावे. जोडीदाराच्या कामगिरीचे कौतुक कराल. कुटुंबात वैचारिक देवाणघेवाण होईल. स्वत:च्या मतावर आग्रही राहाल.

मिथुन:-
हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जावे. नियम मोडून चालणार नाहीत. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. छुप्या शत्रूंचा त्रास वाढू शकतो.

कर्क:-
अचानक धनलाभाची शक्यता. कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल. नवीन नियम पाळताना कसरत करावी लागेल. सहकार्‍यांना मदतीचा हात पुढे कराल.

सिंह:-
घरातील मोठ्यांचा आधार मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. ओळखीतून रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकार्‍यांच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल.

कन्या:-
कामात चंचलता आड येऊ शकते. वेळेचे योग्य पालन करावे. नियोजनबद्ध कामे आखावीत. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. भागीदाराशी मतभेद होण्याची शक्यता.

तूळ:-
करमणुकीतून नवीन गोष्टी शिकाल. जुगाराची आवड पूर्ण कराल. आशावादी दृष्टीने कामाकडे पहावे. घरात तुमचे प्रभुत्व राहील. कलेची आवड जोपासाल.

वृश्चिक:-
आर्थिक गरज भागेल. गोष्टींची आवश्यकता लक्षात घ्यावी. जिद्दीने कामे करण्यावर भर द्याल. जवळचा प्रवास चांगला होईल. क्रोध वृत्तीत वाढ होऊ शकते.

धनू:-
साधक बाधक विचार करावा लागेल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. हित शत्रूंवर जय मिळवाल. व्यवसायातील विरोधी हालचाली लक्षात घ्या. विवेक बुद्धीचा योग्य वापर करावा.

मकर:-
तुमच्यातील धाडस वाढेल. योग्य व नियोजन पूर्व कामे आखावीत. दूरदृष्टी ठेवून वागावे. चोख कामे करण्याकडे कल राहील. कौटुंबिक बाबतीत निराशा झटकून टाका.

कुंभ:-
योग्य व्यावहारिक ज्ञान वापरावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मर्जीप्रमाणे दिवस घालवाल. फटकळपणे बोलणे टाळावे. अति स्पष्टता बरी नव्हे.

मीन:-
कामाला अधिक उत्साह येईल. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. व्यावसायिक चिंता दूर कराव्यात. प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. वाढत्या व्यापामुळे व्यस्त राहाल.

आपल्या मोबाईलवर दररोज मोफत राशिभविष्य मिळविण्यासाठी 9766382780 या क्रमांकावर " राशिभविष्य " असे टाईप करून पाठवा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close